Monday, 28 March 2011

खुपते तिथे गुप्ते - २६ मार्च

कवी - वैभव जोशी

सादरकर्ता - सचिन खेडेकर

वगैरे

पुन्हा घेतली मे भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे

बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले पुढारी वगैरे

म्हणा तूच किंमत करावीस माझी
तुला शोभते सावकारी वगैरे

कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो जिव्हारी वगैरे

तिथे एकटा तोच होता दरिद्रि
रुबाबात होते पुजारी वगैरे

आता फक्त होतील भेटी मनांच्या
मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे

किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे

असे ऐकले शेवटी न्याय होतो
पुढे काय झाले निठारी वगैरे

चला दूर जाउ नवे राष्ट्र वसवू
इथे फार झाले बिहारी वगैरे

3 comments:

  1. सदर कविता वैभव जोशी यांची आहे.

    ReplyDelete
  2. मला ते ठाऊक आहे.
    माझे पहिलेच वाक्य "कवी - वैभव जोशी" असे आहे.

    ReplyDelete
  3. असे ऐकले शेवटी न्याय होतो
    पुढे काय झाले निठारी वगैरे

    चला दूर जाउ नवे राष्ट्र वसवू
    इथे फार झाले बिहारी वगैरे



    great!

    ReplyDelete